अधिक कदम : borderless World Foundation
खूप सोपं आहे इथे बसून कश्मीर वर बोलणं. तिथली परिस्तिथी ऐकून तिथल्या लोकांबद्दल द्वेष करणं. तिथे काय करायला हवं, काय नको हे सांगणं. भारतीय सैन्य, मुस्लिम, कश्मीर पंडीत यांवर चर्चा रंगतात इकडे. अधीक कदम नावाचा एक व्यक्ती तिथल्या लोकांसाठी काम करायचं ठरवतो. पुणे ते कश्मीर हा प्रवास. Borderless world foundation नावाने अधिक दादाने सुरु केलेली ही संस्था. कश्मीर मधल्या अनाथ मुलींना सांभाळणे, त्याचं शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, लग्न हे सर्व कामे करतो. तसेच काही विकासाची कामं हाती घेतली आहेत सामाजिक-सांस्कृतिक, स्थानिक सामाजिक संरचना. सशस्त्र संघर्षाच्या बळी गेलेल्या स्त्रिया व त्यांच्या पुनर्वसनासाठीचे कार्य. आणि बरेच.