Posts

कापसे भाऊ जन्मदिवस विशेष

Image
                    त्या गायतोंडे या वाटत असेल तो भगवान वगैरे आहे म्हणून पण आमच्या साठी एकच 'सर्वशक्तीशाली एकमात्र भगवान'. 😂 दयानंद कॉलेजचे दोन आणि इंजिनीरिंगच्या चार वर्षाचा सोबती; 'द कापसे भाऊ' उर्फ वैभव कापसे. माझे मित्र मला भेटले की पहिला प्रश्न विचारतात 'काय म्हणतात मग कापसे भाऊ?', 'कापसे भाऊ कुठं आहेत?' जवळपास माझे सगळे मित्र त्याला ओळखतात. तर एवढं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आमच्या सोबत सहा सात वर्षे राहीलं याचा अभिमान बाळगायलाच हवा ना..! भाऊ बद्दल ठळक सांगायचं म्हणजे तो तुम्हाला कधीच कशासाठी नाही म्हणत नाही. बाहेर कुठे फिरायला, चित्रपट पाहायला, रात्री नाश्त्याला, काहीही मदत असो तो नाही कधीच म्हणणार नाही. एकदम सौज्वळ, निरागस, सुशील, साधं, सभ्य, निस्वार्थ हे त्याच्या स्वभावाचे केंद्रबिंदू.

अधिक कदम : borderless World Foundation

Image
खूप सोपं आहे इथे बसून कश्मीर वर बोलणं. तिथली परिस्तिथी ऐकून तिथल्या लोकांबद्दल द्वेष करणं. तिथे काय करायला हवं, काय नको हे  सांगणं. भारतीय सैन्य, मुस्लिम, कश्मीर पंडीत यांवर चर्चा रंगतात इकडे. अधीक कदम नावाचा एक व्यक्ती तिथल्या लोकांसाठी काम करायचं ठरवतो. पुणे ते कश्मीर हा प्रवास. Borderless world foundation नावाने अधिक दादाने सुरु केलेली ही संस्था. कश्मीर मधल्या अनाथ मुलींना सांभाळणे, त्याचं शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, लग्न हे सर्व कामे करतो. तसेच काही विकासाची कामं हाती घेतली आहेत सामाजिक-सांस्कृतिक, स्थानिक सामाजिक संरचना. सशस्त्र संघर्षाच्या बळी गेलेल्या स्त्रिया व त्यांच्या पुनर्वसनासाठीचे कार्य. आणि बरेच.

माझे, आमचे, सर्वांचे राजन खान

Image
ज्यांनी आपली संपूर्ण हयात लिहिण्यात, वाचण्यात, बोलण्यात, उपक्रम घेण्यात घालवली त्यांच्याबद्दल माझ्यासारखा काहीच न लिहिणारा माणूस लिहितोय... १/८/२०१६ रोजी राजन खान आमच्या कॉलेजवर व्याख्यान देण्यासाठी आले होते. ते नाव प्रथमच ऐकत होतो. पण जसंजसं व्याख्यान पुढे सरकत होतं, कळत होतं की हा माणूस माझ्या आयुष्यातून काय जाणार नाही. माझं वाचन त्या काळात कमी होतं, पण चळवळीतले काही मित्र होते. पुरोगामी विचार, विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्यता याबद्दल जागरूक होतो. पण सर जे बोलत होते ते काहीतरी वेगळंच होतं. अगोदर कधी न ऐकलेलं असं. ते म्हणाले मी 'माणूस' आहे. मी हसलो. पुढे ते 'माणूस'बद्दल जे सांगत राहिले, मग मात्र हरवून गेलो. ते करुणेचं, समाज शांत, सुखी, भेदरहित करण्याचं बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून अक्षर मानव बद्दल माहिती मिळाली. मनापासून आवडलं ते काम. पुणे कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली. पुढे अक्षर मानवमध्ये सक्रिय सहभाग नोंदवू लागलो.

पीयूष मिश्रा: उन्मादी ते जिंदादील via इन्कलाबी

Image
 'एक बगल मे चांद होगा, एक बगल मे रोटीया' या अगोदर बऱ्याच वेळा ऐकलेलं हे गाणं. पण यावेळेस नकळतपणे या गाण्याच्या शब्दरचनेकडे लक्ष गेलं. ते एकदमच भावलं. गीतकार, गायक शोधायला लागलो. नाव शोधले दोन, सापडलं एकच पियूष मिश्रा. हा तर तोच Image is everything, everything is image (Rockstar) वाला. हा गीतं लिहितो, गातो, अभिनय करतो, दिग्दर्शन करतो, कथा(स्क्रिप्ट) लिहितो, गीत दिग्दर्शन करतो. भन्नाट आहे की हा माणूस!