कापसे भाऊ जन्मदिवस विशेष

                   

त्या गायतोंडे या वाटत असेल तो भगवान वगैरे आहे म्हणून पण आमच्या साठी एकच 'सर्वशक्तीशाली एकमात्र भगवान'. 😂
दयानंद कॉलेजचे दोन आणि इंजिनीरिंगच्या चार वर्षाचा सोबती; 'द कापसे भाऊ' उर्फ वैभव कापसे. माझे मित्र मला भेटले की पहिला प्रश्न विचारतात 'काय म्हणतात मग कापसे भाऊ?', 'कापसे भाऊ कुठं आहेत?' जवळपास माझे सगळे मित्र त्याला ओळखतात. तर एवढं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आमच्या सोबत सहा सात वर्षे राहीलं याचा अभिमान बाळगायलाच हवा ना..! भाऊ बद्दल ठळक सांगायचं म्हणजे तो तुम्हाला कधीच कशासाठी नाही म्हणत नाही. बाहेर कुठे फिरायला, चित्रपट पाहायला, रात्री नाश्त्याला, काहीही मदत असो तो नाही कधीच म्हणणार नाही. एकदम सौज्वळ, निरागस, सुशील, साधं, सभ्य, निस्वार्थ हे त्याच्या स्वभावाचे केंद्रबिंदू.

आकरावीत दयानंद कॉलेजला भेट झाली. लातुरातली आमची टोळी, कधी कॉलेज बुडवणं, जन्नत(कॉलेज पार्किंग) मध्ये बसणं, area ५१, अभ्यास (कधी कधी), शिकवणी वर्ग, मार्केट यार्ड रोड, ट्युशन area, कित्येक प्रसंग आठवणी माझ्या स्मृतीत आजतागत ताजे आहेत. बारावी काढली, पास झालो.  ठरलेलं अगोदरच पुढील शिक्षण पुण्यात. आम्हाला वेगळे वेगळे कॉलेज भेटले. भाऊ अभियांत्रिकीचे(😂) प्रथम वर्ष घरी राहायचे. एखाद्या रविवारी आम्हाला दर्शन द्यायला यायचे. घरी बसून कंटाळा किंवा आमचा विरह सहन न झाल्यामुळे तृतीय वर्षा पासून आमच्या सोबत राहायला येऊन आम्हाला धन्य करून टाकलं.

पुण्यातलं जन्नत आमचं वेगळं विश्व. हे जन्नत म्हणजे आमचा पुण्यातील फ्लॅट. याचा संदर्भ दयानंद कॉलेजची पार्किंगशी जोडला तो आम्हीच. जन्नतचा दरारा होता बरं सगळीकडे. फिरणं, टवाळक्या करणं, अभ्यास, कधी रुसवे,  फुगवे, भांडण, हसी, मजाक, चेष्टा सगळं सगळं अनुभवलं. न ठरवता केलेले ट्रीपचे नियोजन असो की चित्रपटाला जायचं असो माघार नाहीच. अभियांत्रिकीच्या शेवटी शेवटी जरी ते फ्लॅट वर कमी रहात असले तरी गप्पांचे केंद्रबिंदू तेच. आमचं भविष्यात काही झालं नाही तरी त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही निवांत आहोत. सालं PA म्हणून जरी ठेवला तरी मोक्कार कमाई होईल असं मला मनापासून वाटतं.


आम्ही नेहमी त्याची चेष्टा करतो. अपमान नाही. त्याचा मऊसूत स्वभाव आम्हाला जोडून ठेवतो. खूप मित्र भेटली, पण तुझ्यासारखा तू एकटाच. सगळेच सोबत आहोत, राहू.  अशा आमच्या एकदम 'ब्रँड', दैवत, क्रीम स्टोन टाइप व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
लब्यु भावड्या.
- अनिकेत पाटील





 


 Starbucks ला कॉफी वगैरे




Popular posts from this blog

माझे, आमचे, सर्वांचे राजन खान

पीयूष मिश्रा: उन्मादी ते जिंदादील via इन्कलाबी